प्रताप ऑनलाईन सेंटरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जाणून घ्या आमचा उद्देश, कार्य आणि आमची विचारसरणी.
आजच्या डिजिटल युगात, प्रत्येक सरकारी आणि Private काम ऑनलाईन झाले आहे. फक्त, ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना योग्य माहिती किंवा कोणत्याही सेवांचा लाभ घेताना अडचणी येतात. कारण कोणती स्कीम नवीन आली हे माहित पडतच नाही याचा तोडगा काढण्यासाठी प्रताप ऑनलाईन सेंटरची ची सुरुवात केली आहे.
आम्ही सर्व प्रकारची शासकीय कामे, बँकिंग सेवा, पॅन कार्ड, आधार सेवा, आणि विविध सरकारी योजनांचे अर्ज अत्यंत सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने भरून देतो. आमच्याकडे कोणतेही शिल्लक चार्जेस नाहीत, जे आहे ते स्पष्ट आणि प्रामाणिक आहे.
आमला खुर्द येथील सर्व लोकांना एकाच छताखाली सर्व डिजिटल सेवा उपलब्ध करून देणे. कामात पारदर्शकता ठेवून ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाचवणे. प्रत्येक काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करणे.
आमला खुर्द येथील सर्वात विश्वसनीय आणि प्रगत डिजिटल सेवा केंद्र बनणे. 'डिजिटल इंडिया' चे स्वप्न तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना तंत्रज्ञानाशी जोडणे.
विश्वास, प्रामाणिकपणा आणि ग्राहक समाधान हीच आमची मुख्य मूल्ये आहेत. आम्ही ग्राहकांच्या डेटाची पूर्ण सुरक्षा आणि गोपनीयता बाळगतो.
प्रताप राठोड
कोणत्याही सेवेबद्दल माहिती हवी असल्यास त्वरित संपर्क करा. आम्ही आपल्याला मदत करण्यासाठी नेहमी तत्पर आहोत.